अडचणीतील व्यक्तींना अन्नपुरवठ्यासाठी भाजपाचा पुढाकार गरजवंतांनी संपर्क साधण्याचे आवाहन

अडचणीतील व्यक्तींना अन्नपुरवठ्यासाठी भाजपाचा पुढाकार गरजवंतांनी संपर्क साधण्याचे आवाहन


 विश्व सुपर मार्केट 24 तास खुले


 लातूर /प्रतिनिधी :कोरोनाच्या साथीमुळे राज्यासह लातूर जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. शिक्षणासाठी बाहेरगावाहून येथे आलेले अनेक जण त्यामुळे अडकून पडले असून त्यांना अन्न- पाणी मिळणेही कठीण झाले आहे. अशा व्यक्तींना अन्न पुरवठा करण्यासाठी शहर भाजपाने पुढाकार घेतला असून गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते .राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येऊन राहतात. संचारबंदी लागू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना आपापल्या गावी जाता आले नाही. विद्यार्थ्यांचे येथे घरही नाही. संचारबंदीमुळे मेस व हॉटेल बंद झाले असून विद्यार्थ्यांना जेवण मिळणे कठीण आहे .या विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये यासाठी शहर भाजपा पुढे सरसावली आहे.
 विद्यार्थ्यांसह समाजातील असे अनेक घटक आहेत ज्यांना या कालावधीत अन्न मिळणे कठीण आहे .वृद्ध ,आजारी व्यक्तीना बाजारात जाऊन खरेदी करणेही  शक्य नाही. अनेकजण एकटे राहतात. त्यांनाही उपाशी रहावे लागत आहे .ही अडचण दूर