देशातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व भारतीयांनी पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

26!3!20 आग्रलेख  मोदी मुळे  शक्य !


         जगभरातील  बहुतांशी  देशामध्ये धुमाकूळ घालणारे वैश्विक  बिमारी कोरोना वायरस प्रादुर्भाव प्रसार रोखण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील भारतवासीयांना दिनांक 22मार्च रोजी जनता  कर्फ्यू  पालनकरावयाचे     आवाहन केले. देशातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व भारतीयांनी पंतप्रधान मोदी यांच्या या  आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि स्वयंस्फूर्तीने जनता  कर्फ्यू चे पालन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी   कोरोना मुळे भयंकर परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे, देशवासी जनतेचे मला काही आठवडे  हवेआहेत , असे नमूद केले होते .


         दिनांक 24  मार्च रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना परत संबोधित केले. आणि देशातील प्रत्येक  नागरिकांच्या, त्यांच्या परिवाराच्या रक्षणासाठी एक मोठी महत्वपूर्ण अशी देशहिताची  घोषणा केली. देशातील नागरिकांचे  काही आठवडे आपणाला हवे याची आठवण करून देऊन पंतप्रधान मोदी यांनी असे घोषित केले की, मध्यरात्री बारा वाजेपासून  एकवीस दिवस संपूर्ण देशभर लॉक डाऊन  लागू करण्यात आला आहे . एकवीस दिवस म्हणजे जवळपास 14, 15 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत देशात देशभर  लोक डाऊन लागू राहणार आहे. जनता कर्फ्यू पेक्षाही कठीण असा  हा लॉक डाऊन असणार आहे  काही राज्यांनी आधीच त्याच्या राज्यात  लॉक डाऊन लागू केलेला आहे.  त्यांचे याबाबत  कौतुक करावयासहवे. ते राज्य अभिनंदनास पात्र आहेत ते नमूद करीत पंतप्रधान  मोदी यांनी यापुढे एकवीस दिवस देशभर लॉक डाऊन असल्याचे स्पष्ट केले. लॉक डाऊन म्हणजे  कर्फ्यू आहे. यादरम्यान कोणालाही  रस्त्यावर येता येणार नाही, प्रत्येकाने आपल्या घरातच बसावे  जर कोणी रस्त्यावर आला तर त्याच्यावर कारवाई होईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. 


     कोरोना म्हणजे नेमके काय? हे स्पष्ट करताना मोदी यांनी एक  पत्रक  दाखवले त्यावर  होते, कोरणा याने, कोई   रोड  पर   ना
 निकले जगामधील ज्या देशांमध्ये   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला चीन, इटली वगैरेसारख्या देशांचा उल्लेख करीत मोदी यांनी असे निदर्शनास आणले  . या देशांमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध नाही असे नाही.  अध्यावत यंत्रणा उपलब्ध नाही असे नाही , परंतु तेथील लोकसंख्या कमी असतानाही  देशांमधून, कोरोना  प्रसार झाला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे . हे जवळपास चौदा पंधरा दिवस का येत नाही   आणि एकदा  लागण झाली म्हणजे झपाट्याने पसरतो आणि परिस्थिती  हाताबाहेर जाते त्या देशांनी वेळीच खबरदारी घेतली नाही, माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाची, त्याच्या कुटुंबीयांची  परिवाराची आरोग्याची काळजी घेणे, त्यांचे प्रत्येकाचे जीव वाचवणे, माझी, माझ्या सरकारचे, राज्य सरकारचे जबाबदारी आहे . नागरिकांची आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य आहे, त्याकरिता कर्फ्यू सारख  लॉक डाऊन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे .माझी नागरिकांना   हातजोडून विनंती आहे, की नागरिकांनी घराबाहेर पडू नये . घरातच राहावे  आणि प्रशासन घेत असलेल्या काळजी खबरदारी आणि उपायांना सहकार्य करावे. हा कर्फ्यू पंतप्रधान पासून,  देशातील सामान्य   नागरिकांकरिता लागू  आहे .याची सर्वांनी नोंद घ्यावी. असेही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले. 


         पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी रात्री आठ वाजता  संदेश  देण्यासाठी  येतात त्यावेळी मध्यरात्री बारा वाजल्यापासून काहीना काही बंद करून जातात, असे म्हटले जात असले, तरी पंतप्रधान मोदी हे  देशहितासाठी देशाच्या रक्षणार्थ नागरिकांच्या रक्षणार्थ महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतात , काटेकोरपणे पालन करीत  धाडसाने अंमलबजावणी करतात म्हणून ते शक्य होते, असे म्हणावे लागेल. मोदी ऐवजी अन्य कोणी पंतप्रधान असते, तर असे निर्णय धाडसाने घेणे आणि त्याची अंमलबजावणी होणे  शक्य होईल, असे सद्यपरिस्थितीत वाटत नाही, कोणाला काही वाटो कोणी काही    म्हणू, केवळ आणि केवळ, मोदी मुळेच शक्य आहे असे आमचे प्रांजळ मत आहे. !