१६ डिसेंबर पर्यंत प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन
सातारा (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालया मार्फत १५ ते २९ वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे १८ डिसेंबर रोजी । सैनिक स्कूल येथे सकाळी ९.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली आहे. युवा महोत्सवात लोकृत्य, लोकगीत, एकांकिता (इंग्रजी/हिंदी), शास्त्रीय नृत्य, सितार, बासरी, तबला, विणा,मृदंग, होर्मोनियम (लाईट), गीटार, मणिपुरी नृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी नृत्य, वक्तृत्व हिंदी, इंग्रजी या कला प्रकरांचा समावेश करण्यात आला आहे. युवा महोत्सवात प्रवेश विनामुल्य असून प्राविण्य संपादन करणाऱ्या कलाकारांना शासनाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी १६ डिसेंबरपर्यंत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहनही श्री. नाईक यांनी केले आहे.