१० सहकारी संस्थांचा प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर

सातारा (जिमाका): सातारा तालुक्यातील १० सहकारी संस्थांचा प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रारुप मतदार यादी तालुका सहकारी अधिकारी तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था सातारा तालुका कार्यालयाच्या संबंधित संस्थेच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे. यादीबाबत सभासदांना काही हरकती अगर आक्षेप असतील तर २० डिसेंबरपर्यंत पुराव्यासह लेखी स्वरुपात द्यावे, असे तालुका सहकारी अधिकारी तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था बाळासाहेब तावरे यांनी कळविले आहे.प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेल्या संस्था पुढीलप्रमाणे. विजयश्री ग्रामीण जिल्हास्तरीय युवा बिगरशेती सहकारी पतसंस्था, लिंब, श्री सावता महाराज ग्रामीण बिगरशेती सहाकारी पतसंस्था, लिंब-गोवे, कै. राजमाता सुमित्राराजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, अतित, श्री. चौडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, नागठाणे, श्री. जानाईदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, जिहे, आष्टविनायक ग्रामीण युवा महोत्सवाचे बिगरशेती सहकारी पतसंस्था, शेंद्रे, सातारा जिल्हा परिषद अभियंता व तांत्रिक कर्मचारी सहकारी पतसंस्था, सातारा, युगपुरुष शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था, शेंद्रे, सिंचन सेवक सहकारी पतसंस्था, कृष्णानगर, सातारा, दि. न्यु इंडिया शयुअरन्स एम्लॉईज को-ऑप-क्रेडीट सोसा.लि., सातारा. महोत्सवाचे